शेतकऱ्यांच्या हितासाठी ; बहुजनांच्या सुखासाठी

जय शिवराय

किसान संघटना

ध्येय आणि उद्दिष्टे

ध्येय आणि उद्दिष्टे

ध्येय

सर्व स्तरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध राहून सामुहिक विकास करणे.

उद्दिष्टे

  • शेतकाऱ्याच्या प्रत्येक मालाला हमीभाव मिळावा यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी. (एफआरपी, आणि एसएमपी या मुद्द्यावर शेतीमालाच्या मूल्यनिश्चितीचा पाठपुरावा )
  • शेतमालाचे विपणन योग्य रितीने व्हावे यासाठी शासनाकडे आग्रह धरणे.
  • शेतीला वीज रास्त दरात तसेच अखंडीत मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणे.
  • शेती मालाच्या आयात - निर्यात धोरणाचा फटका अनेक वेळा शेतकऱ्यांना बसतो,यासाठी केंद्र सरकारचे कृषी धोरण देशातील शेतीला पुरक असावे यासाठी प्रयत्न करणे.
  • सिंचनसुविधा आणि शेतीविषयक विविध अवजारे खरेदी करताना शेतकऱ्यांना भरघोस अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करणे.
  • ठिबक सिंचनचा वापर वाढावा,यासाठी मार्गदर्शन व जागृती करणे.
  • शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीमाल प्रक्रिया उद्योग यांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणे आणि कृषी पुरक उद्याेगांना शासानाचे अनुदान वाढावे,यासाठी पाठपुरावा करणे.
  • शेतीसाठी केंद्रसरकारचा स्वंतत्र अर्थसंकल्प असावा यासाठी जनजागृती करणे.
  • ग्रामीण आणि निमशहरी भागात कोल्ड स्टोअरेज उभारावेत यासाठी प्रयत्न करणे
  • ग्रामीण भागातील पानंदी दुरूस्तीसाठी निधी मिळावा,यासाठी संघटन करणे.
  • शेतकऱ्याला निश्चित अशी पेन्शन मिळावी यासाठी मागणी लावून धरणे.