शेतकऱ्यांच्या हितासाठी ; बहुजनांच्या सुखासाठी

जय शिवराय

किसान संघटना
Shape Shape
शेतकऱ्यांच्या हितासाठी ; बहुजनांच्या सुखासाठी

जय शिवराय किसान संघटना

शेतकरी !

निढळाचा घाम गाळून काळ्या आईला विकासाचा हिरवा शालू नेसवणारा, मातीतून मोती पिकवणारा, शेतात तरारून वर आलेल्या पिकावर जीव ओवाळून टाकणारा, जगाचा पोशिंदा, कृषिप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा. संघर्षाशिवाय शेतकऱ्याला आज पर्यंत काहीच मिळाले नाही. साहजिकच आजचा शेतकरी न्याय हक्कासाठी जागृत झाला आहे. म्हणुन....शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झटणारी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी, शेतकऱ्यांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारी, शेतकऱ्यांच्या पोरांनी तयार केलेली एक लढवय्या संघटना म्हणजेच जय शिवराय किसान संघटना.

उसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालाच पाहिजे, दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी या सह सर्व पिकांसाठी रास्त दर मिळाला पाहिजे, असा हुंकार देत शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली वाठार तर्फे वडगाव येथील इरा हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात वाचा फोडली व कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथील शाहू स्मारक भवनात 10 ऑक्टोंबर 2018 या घटस्थापनेच्या दिवशी जय शिवराय किसान संघटनेची स्थापना झाली. धडक मोर्चे, बाईक रॅली, निदर्शने, निषेध फेऱ्या, निवेदने अशा विविध आंदोलनांच्या माध्यमातून जय शिवराय किसान संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकण्याचे काम करत आहे.

पुढे वाचा
Shape Shape

संस्थापक अध्यक्ष मनोगत

श्री. शिवाजी माने

प्रसिद्ध अमेरिकन इंग्लिश कवी रॉबर्ट फ्रॉस्ट त्याच्या कवितेत म्हणतो..

"Woods are lovely, dark and deep, But I have promises to keep, And miles to go before I sleep, And miles to go before I sleep."

"हे आयुष्याचे जंगल सुंदर असलं तरी घनगर्द आणि दाट आहे; पण मला आत्मवचन घ्यायचं आहे... चिरनिद्रा येईपर्यंत मला याच जंगलातून चालायचं आहे.. याच जंगलातून चालायचं आहे..!"

वयाच्या 27 व्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्याशा भादोले गावचा ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच म्हणून खऱ्या अर्थाने समाजकारणांमध्ये भाग घ्यायला सुरवात केली. त्यामुळे अगदी पहिल्यापासून दीनदुबळ्या आणि गरिबांसाठी काम करण्याची तळमळ आणि इच्छा होती.

ध्येय आणि उद्दिष्टे

ध्येय

सर्व स्तरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध राहून सामुहिक विकास करणे.

उद्दिष्टे

  • शेतकाऱ्याच्या प्रत्येक मालाला हमीभाव मिळावा यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी. (एफआरपी, आणि एसएमपी या मुद्द्यावर शेतीमालाच्या मूल्यनिश्चितीचा पाठपुरावा )
  • शेतमालाचे विपणन योग्य रितीने व्हावे यासाठी शासनाकडे आग्रह धरणे.
  • शेतीला वीज रास्त दरात तसेच अखंडीत मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणे.
  • शेती मालाच्या आयात - निर्यात धोरणाचा फटका अनेक वेळा शेतकऱ्यांना बसतो,यासाठी केंद्र सरकारचे कृषी धोरण देशातील शेतीला पुरक असावे यासाठी प्रयत्न करणे.