शेतकऱ्यांच्या हितासाठी ; बहुजनांच्या सुखासाठी

जय शिवराय

किसान संघटना

आमच्या विषयी

शेतकऱ्यांच्या हितासाठी ; बहुजनांच्या सुखासाठी

जय शिवराय किसान संघटना

शेतकरी !

निढळाचा घाम गाळून काळ्या आईला विकासाचा हिरवा शालू नेसवणारा, मातीतून मोती पिकवणारा, शेतात तरारून वर आलेल्या पिकावर जीव ओवाळून टाकणारा, जगाचा पोशिंदा, कृषिप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा. संघर्षाशिवाय शेतकऱ्याला आज पर्यंत काहीच मिळाले नाही. साहजिकच आजचा शेतकरी न्याय हक्कासाठी जागृत झाला आहे. म्हणुन....शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झटणारी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी, शेतकऱ्यांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारी, शेतकऱ्यांच्या पोरांनी तयार केलेली एक लढवय्या संघटना म्हणजेच जय शिवराय किसान संघटना.

उसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालाच पाहिजे, दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी या सह सर्व पिकांसाठी रास्त दर मिळाला पाहिजे, असा हुंकार देत शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली वाठार तर्फे वडगाव येथील इरा हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात वाचा फोडली व कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथील शाहू स्मारक भवनात 10 ऑक्टोंबर 2018 या घटस्थापनेच्या दिवशी जय शिवराय किसान संघटनेची स्थापना झाली. धडक मोर्चे, बाईक रॅली, निदर्शने, निषेध फेऱ्या, निवेदने अशा विविध आंदोलनांच्या माध्यमातून जय शिवराय किसान संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकण्याचे काम करत आहे.

'शेतकऱ्याच्या हितासाठी व बहुजनांच्या सुखासाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन ही संघटना फक्त रस्त्यावरचा नव्हे तर कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने संघर्ष करत आहे.