शेतकऱ्यांच्या हितासाठी ; बहुजनांच्या सुखासाठी

जय शिवराय

किसान संघटना

संस्थापक अध्यक्ष मनोगत

संस्थापक अध्यक्ष मनोगत

प्रसिद्ध अमेरिकन इंग्लिश कवी रॉबर्ट फ्रॉस्ट त्याच्या कवितेत म्हणतो..

Woods are lovely, dark and deep, But I have promises to keep, And miles to go before I sleep, And miles to go before I sleep.

हे आयुष्याचे जंगल सुंदर असलं तरी घनगर्द आणि दाट आहे; पण मला आत्मवचन घ्यायचं आहे... चिरनिद्रा येईपर्यंत मला याच जंगलातून चालायचं आहे.. याच जंगलातून चालायचं आहे..!


वयाच्या 27 व्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्याशा भादोले गावचा ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच म्हणून खऱ्या अर्थाने समाजकारणांमध्ये भाग घ्यायला सुरवात केली. त्यामुळे अगदी पहिल्यापासून दीनदुबळ्या आणि गरिबांसाठी काम करण्याची तळमळ आणि इच्छा होती. राज्यस्तरीय कबड्डीपटू असल्याने आपसुकच नेतृत्वगुण बहरास लागले. ऐन तारुण्यामध्ये शरद जोशीची अंगारमळा वाचल्यानंतर सध्याच्या शेतकर्यांविषयी विविध घटकावरून होणारा अन्याय विरूध्द वाचा फोडण्यासाठी शेतकरी संघटने कडे आकृष्ट झाला. एकविसाव्या दशकामध्ये हातकणंगले तालुक्यातील गाव ना गाव पिंजून काढले. सोबतच्या काही सहकाऱ्यांनी वेगळी चूल मांडली. शेतकरी संघटनेची शकले पडली. मातीला जात आणि धर्म नसतो; मात्र शेतकरी संघटनांना लागलेल्या जातीवादाने व्यथित झालो. स्वतःची संघटना, स्वतःची ध्येयधोरणे आणि स्वतःचा विधायक कार्यक्रम असल्याशिवाय पर्याय नाही हे कळून चुकल्यावर जय शिवराय किसान संघटनेची स्थापना केली. शेतकऱ्यांना प्रत्येक पिकांसाठी शेती उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळवून देणे या एकाच ध्येयाने पेटून उठलो आहे. दुधाला योग्य भाव, रास्त दरात वीज, शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना अशा अनेक मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही.

- शिवाजीराव माने,
संस्थापक अध्यक्ष,
जय शिवराय किसान संघटना.